Sunday, March 28, 2010

बोकेह

A try

वरील प्रमाणे छायाचित्र घेण्यासाठी, मी कॅमेराच्या लेन्सवर खालील प्रमाणे जोड लावला.

DIY Bokeh Kit Final

हे तयार करण्यासाठी लागणारे सामान :
- पुठ्ठा
- काळ्या रंगाचा कागद 
कृती :

bokeh filter

१. वर दाखवल्या प्रमाणे पुठ्ठ्याचे तुकडे करून घ्या .
    माझ्या कडची लेन्स ६२ मिमी ची असल्याने आकृतीत ६२ मिमी चे माप दिले आहे.
तुमच्या कडची लेन्स चे माप वेगळे असल्यास ?
    ९० मिमी X ९० मिमी चे २ तुकडे
    ९० मिमी X ९ मिमी
    ८० मिमी X ९ मिमी चे २ तुकडे

२. ९० मिमी X ९० मिमी वाला १ पुठ्ठा घ्या, त्यावर बरोबर मधोमध लेन्स उभी ठेवा.
    लेन्स च्या आकाराप्रमाणे त्यावर रेघ आखून घ्या, म्हणजे आकृती नं २ मधल्या प्रमाणे दिसेल.
३. दूसरा ९० मिमी X ९० मिमी वाला पुठ्ठा घ्या, ह्याच्या वरील गोल हा वरील गोला पेक्षा म्हणजे तुमच्या लेन्स च्या मापा पेक्षा छोटा असावा, ह्या साठी मी माझी दूसरी लेन्स वापरली ५२ मिमी वाली. वरील प्रमाणे गोल आखून घ्यावा.
४. वरील दोन्ही गोल नीट कापून घ्यावेत. ह्या कापलेल्या गोलात तुमच्या दोन्ही लेन्स बसतात ह्याची खात्री करून घ्या.
५. ह्या दोन्ही पुठ्ठ्यांच्या मध्ये लावायच्या पट्ट्या कापून घ्याव्यात . ८० मिमी X ९ मिमी च्या २ आणि ९० मिमी X ९ मिमी ची एक.
६.  ९० मिमी X ९० मिमी वाला पुठ्ठा घ्या, त्याच्या एका बाजूला ९०X ९ मिमी वाली पट्टी चिकटवा आणि त्या पट्टीला दोन्ही टोकाला  उरलेल्या दोन्ही पट्ट्या काटकोनात चिकटवा, खालील प्रमाणे दिसेल

DIY Bokeh kit 5

७. आता ह्यावर दुसरा पुठ्ठा चिकटवा म्हणजे खालील प्रमाणे दिसेल.
DIY Bokeh Kit 3

मध्ये लावलेल्या पट्ट्यांमुळे ह्यात कागद आत जाण्यासाठी खाच तयार होईल
८. एक काळ्या रंगाचा जाड कागद घ्या, तो ७२ मिमी X ८१ मिमी ह्या मापाने कापून घ्या
( ९० - ९ - ९ , ९० - ९ खाचेचे माप )
९. वरील कागदावर तुम्हाला हवे त्या आकार कापून घ्या, हा कागद वर दाखवल्या प्रमाणे दोन्ही पुठ्ठ्यांच्या मध्ये घाला आणि हे सगळे एकत्रपणे लेन्स वर लावा

काही वेगवेगळे आकार

जर तुमच्या कडची लेन्स हि ६२ मिमी पेक्षा मोठी असेल तर त्या प्रमाणे ९० च्या जागी मोठे माप घ्यावे
(
क्ष = लेन्स चे माप
पुठ्ठ्याचे माप = क्ष +९+ ५
९ हे माप आपण बाजूला लावणाऱ्या पट्ट्यांचे माप आहे.
५ हे मधला गोल आणि पट्ट्या ह्यां मधील अंतर आहे , ह्या मुळे मध्ये घातलेला कागद आहे गोलामधून बाहेर येत नाही.

आपण पट्टीचे माप बदल्यास त्याप्रमाणे कागदाचे माप पण बदलावे.
)


धन्यवाद,
निखिल वाळवेकर